पाचोरा, प्रतिनिधी– तालुक्यातील गोरडखेडा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सालदारकी करत असलेल्या इसमास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सालदाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कनाशी ता. भडगांव येथील मुळ रहिवाशी असलेल्या व गोराडखेडा ता. पाचोरा येथे सालदारकी करत असलेले तात्या रामचंद्र भिल (वय – ५५) हे आज सायंकाळी गोराडखेडा गावा नजीक पायी चालत असतांना जळगांव कडुन पाचोरा कडे जाणाऱ्या धरधाव कारने जोरदार धडक देवुन काय चालक घटना स्थळावरुन फरार झाला आहे. तात्या भिल यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले.