पाचोरा पोलीस स्थानकात वार्षिक तपासणी

पाचोरा प्रतिनिधी । येथील पोलीस स्थानकात जिल्हा अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या उपस्थितीत वार्षिक तपासणी करण्यात आली.

पाचोरा पोलीस स्थानकाला डॉ. प्रवीण मुंढे यांनी भेट देऊन वार्षिक तपासणी केली. त्यांनी विविध बाबींची माहिती जाणून घेतली. यात गुन्ह्यांचा निपटारा, पेंडिंग गुन्हे, न्यायालयातील निकाली केसेस, मुद्देमाल, शस्त्रागार पाहणी, विविध रजिस्टरे, भाग ५, भाग ६, प्रोबेशन केसेस याबाबत तपासणी केली. पोलिस ठाण्यात कमीत कमी गुन्हे दाखल होण्यासाठी प्रयत्न करावे, गुन्हेगारी स्वरूपाच्या नागरिकांवर वचक ठेऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच धडा शिकवावा या बाबत मार्गदर्शन केले. तर तक्रारी घेऊन येणार्‍या महिला व वृद्धांचा सन्मान राखून त्यांना त्यांच्या कामास तातडीने प्राधान्य देण्याच्या सूचनाही दिल्या.

याप्रसंगी डॉ. मुंढे यांनी अल्पावधीत मोठ्या प्रमाणात गुन्ह्याचा निपटारा करणार्‍या सहायक फौजदार रामदास चौधरी (पाच हजार), ज्ञानेश्‍वर पाटील (२ हजार), अजय मालचे (२ हजार) यांना रोख स्वरूपात पारितोषीक देऊन देऊन सन्मानित केले. यावेळी पोनि किसनराव नजन पाटील, सपोनि रवींद्र मोरे, पोउनि दत्तात्रय नलावडे, गणेश चौबे, विकास पाटील, एएसआय हंसराज मोरे, ज्ञानेश्‍वर पाटील, दीपक सुरवाडे, शाम पाटील, सचिन पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content