Home क्राईम मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले

0
43


पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सामनेर येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याच दोन्हींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

तालुक्यातील सामनेर ता. पाचोरा येथील स्त्री-पुरूष सकाळी सामनेर ते लासगाव दरम्यान रोज जात असतात. या अनुषंगाने आज पहाटे पाच ते साडे पाचच्या दरम्यान मनिषा साहेबराव पाटील (वय – ५० ) व अनिता शहादु पाटील (वय – ४८) या दोघी महिला मॉर्निंग वॉक करून परत असतांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघी महिला जागीच गतप्राण झाल्या.

हा अपघात एवढा जोरदार होता की एक महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. तर दुसरी महिलेस ५० मीटर फरफटत नेले. दरम्यान वाहन चालकाने घटना स्थळावरून पलायन केले आहे. दोघी महिलांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे ,पोलिस हवालदार रामदास चौधरी, पुढील तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound