भडगाव, प्रतिनिधी । जनतेच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या आ. किशोर पाटीलांना विजयी करण्याचे आवाहन शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे यांनी शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत ऊमेदवार आ. किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ केले.
भडगाव येथील आझाद चौक येथे झुंजार व्याख्याते शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या जाहीर सभेचे सुत्रसंचालन शहरप्रमुख मनोहर चौधरी यांनी केले.
यावेळी डॉ.प्रमोद पाटील यांनी विकास करण्यासाठी व वेगवेगळ्या मंजुरी मिळवण्यासाठी मंत्रालयात फेऱ्या माराव्या लागता त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो आणी ती कामे करण्यासाठी किशोर पाटील यांनी रात्र दिवस मेहनत घेतली आहे. त्याचे आम्ही साक्षीदार आहोत असे ते म्हणाले. या वेळी अफाट जनसमुदाय उपस्थित होता. डॉ. विशाल पाटील यांनी जनतेच्या विकासासाठी किशोर पाटील हे अहोरात्र झटतात त्यासाठी त्यांनी विजयश्रीसाठी लीड जास्त प्रमाणात द्यावा असे आवाहन केले. विकास तात्या यांनी आपल्या भाषणात आ.किशोर आप्पा यांनी वाडे गुढे जुवार्डी येथिल चार वर्रषापासून खडलेली कामेसुद्धा मार्गी लावली तसेच विकास करणारा एकमेव आमदार आपल्याला लाभला आहे. त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. अमोल पाटील यांनी देंवेद्र फडवणिस व नरेंद्र मोदि यांच्या कालखंडात सर्वात जास्त विकासाची कामे झाली असून भडगाव-पाचोरा मतदार संघात किशोर आप्पा यांनी विजेचा प्रश्न असो जल सिंचनचा प्रश्न असो बांधकाम विभागातील रस्ते असो सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. अशा विकास करणार्या आमदार किशोर आप्पाना भरगोस मतांनी विजयी करू असे आश्वासन दिले.
डाॅ.संजिव पाटील यांनी जळगांवला मोदी यांच्याशी सहवास लाभला. तसेच भडगांव पाचोरा मतदार संघात विकासाला न्याय देण्याचे काम आप्पानी केले आहे आणी पुढेही तोच तसाच विकास करायचा असेल तर आप्पाना निवडुन द्यावेच लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर विविध पदाधिकारी उपस्थित होते. भुरा आप्पा, अनिल महाजन, विविध पदाधिकारी यांनी जाहीर सभेस संबोधीत केले. किशोर आप्पा यांनी आपल्या मनोगत मध्ये विकास मुद्यावर हात घातला व म्हणाले काही नामर्द येथे येऊन आपली दिशा बदलण्याचे काम करत आहेत. अफाट जनसमुदाय बघुन आप्पाचे मन गहीवरून आले असेच प्रेम असू द्या भडगावपेठचा रोड येणाऱ्या एका वर्षात नाही झाला तर नगरपालीकेच्या वेळी मत मागायला येणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर नितीन बानगुडे पाटील यांने राष्ट्रवादी काँग्रेसचा समाचार घेतला 15 वर्ष यांचे सरकार असतांना त्यांना विकासाचे शहाणपण सुचले नाही. 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला नसता तर महाराष्ट्रातील एक एक कानाकोपरा ओलीताखाली गेला असता. सर्व खिचड्या यांनी करून ठेवल्या हे घड्याळ दहा वर थांबले आहे तेथेच थांबू द्या असे ते म्हणाले. आपल्या जोरदार शैलित त्यांनी विविध उदाहरणे दिली. सर्वात जास्त निधी विकासासाठी आणणार एकमेव आमदार किशोर आप्पा आहेत. जास्त पैसा झाला की काही लोक मला आमदार झाल्यासारख वाटत असे त्यांना वाटते येणार्या 21 तारखेला विकासासाठी,भगव्यासाठी,महाराष्ट्रासाठी तुमच्या आमच्यासाठी आप्पानाच निवडुन देण्याचे आवाहन नितीन बानगुडे यांने केले. या सभेचे आभार प्रदर्शन जे.के.पाटील यांनी केले. यावेळी अफाट जनसमुदाय उपस्थित होता.
या जाहीर सभेत डॉ.संजिव पाटील, अमोल नाना पाटील, डॉ. विशाल पाटील, डॉ. प्रमोद पाटील, मनोहर चौधरी, गणेश आण्णा परदेशी, भुरा आप्पा, सोमनाथ पाटील, विकास तात्या, दिपक राजपुत, राजेंद्र जिभाऊ, ईम्रान अली सैय्यद, सुनिल पाटील (संपर्क प्रमुख), विनोद पाटील, भाऊसाहेब भोसले, नानासो प्रताप हरी रावजी पाटील, संतोष पाटील, जग्गु भोई, रावसाहेब पाटील, युवराज आबा, विनोद पाटील, डॉ. नाजिम मिर्झा, अतुल पाटील, बापु चिंधा, प्रदिप महाजन, अनिल महाजन, बंटी सोनार, लखिचंद पाटील आदि पदाधिकारी शिवसैनिक व भडगांव शहर व वलवाडी, जुवार्डी, बोदर्डे, निंभोरा, कोठली, आलेले सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते जाहीर सभेचे जे.के.पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.