पाचोरा, प्रतीनीधी | क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पाचोरा शहरात युवकाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, दि ३० रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसात च्या दरम्यान शहराच्या पुनगाव रोड रस्त्यावरील बुर्हानी इंग्लिश मेडियम स्कूल च्या आवारात तरुणांच्या झालेल्या भानगडीत एका २३ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेतील तरुणाला पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेले असता त्यास पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले. उपचारा दरम्यान जखमी तरुण हा मयत झाला. या प्रकरणी मुख्य आरोपी सह काही संशयितांना ताब्यात घेऊन काल रात्री उशिरा पर्यंत खुनाचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार दि. ३० रोजी पाचोरा येथे भडगाव रोड वरील साई मंदिरा जवळ या घटनेतील भूषण नाना शेवरे (वय – २३) रा. दुर्गा नगर, पाचोरा याचे व संशयित आरोपी लोकेश उर्फ विकी वय – २२ ( पूर्ण नाव माहीत नाही) याचे वाहनाचा कट लागल्यावरुन वाद झाला होता असे समजते. त्यानंतर संशयित आरोपीने भुषण नाना शेवरे यास पुनगाव रोडवरील बुर्हानी इंग्लिश मिडियम स्कूल परिसरात साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान फोन करून बोलवले होते. संशयित आरोपी सोबत यावेळी दहा ते बारा अज्ञात तरुण असल्याचे कळते ? दरम्यान भूषण नाना शेवरे याच्या पोटात तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. गंभीर जखमीस त्याच्या सोबत असलेल्या काहींनी उपचारार्थ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी जळगाव नेण्याचा सल्ला दिला.
संबंधीत गंभीर जखमी तरुण जळगाव येथे मयत झाला. या प्रकरणी पाचोरा पोलिसात संशयीत आरोपी लोकेश उर्फ विकी यासह काही अज्ञात तरुणांना पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेतील सशयतांची कसून चौकशी करण्यात येत असून असून दि. ३० रोजी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील हे करीत आहेत.