पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथे शासकीय विश्राम गृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक ११ जुलै रोजी संपन्न झाली. यावेळी पाचोरा आणि भडगाव तालुक्यासाठी नूतन ग्रामीण कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात प्रा. डॉ. विजय शालिग्राम गाडे यांची खान्देश विभागीय उपाध्यक्ष पदी, समाधान मैराळे यांची अमळनेर तालुका अध्यक्ष पदी, नितीन पाटील यांची पाचोरा तालुकाध्यक्ष पत्रकार कृती हल्ला समिती या पदावर निवड तर प्रा. अमोल झेरवाल पाचोरा शहर अध्यक्ष, पत्रकार हल्ला कृती समिती, प्रल्हाद पवार भडगाव तालुकाध्यक्ष पत्रकार कृती समिती करण्यात आली. यावेळी नवीन सदस्यांना नियुक्तीपत्र देत सत्कार करून शुभेछा देण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य महासचिव डॉ. विश्वासराव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली आहे.
यावेळी खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा खान्देश विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, खान्देश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील पत्रकार व सामाजिक हिताच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष, नागराज पाटील, उपाध्यक्ष नंदकुमार शेलकर, पाचोरा तालुका अध्यक्ष प्रवीण ब्राम्हणे, शहर अध्यक्ष राजेंद्र खैरनार, तसेच अमळनेरचे सुरेश कांबळे, नुरखान पठाण, आत्माराम अहिरे यांची उपस्थिती होती.