पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील एका पत्रकाराला आमदार किशोरआप्पा पाटील Mla Kishorappa Patil Audio Clip यांनी कथितरित्या दिलेल्या धमकीच्या रेकॉर्डींगची क्लीप व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची क्रूर हत्या केल्याच्या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून समाजाच्या सर्व स्तरांमधून याच्या विरोधात सूर उमटला आहे. समाजातील बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यातून अधोरेखीत झाला आहे. या पार्श्वभूमिवर काल सकल मराठा समाज आणि समविचारी संघटनांनी भडगावात भव्य मूक मोर्चा काढला. या मोर्चेकर्यांनी नंतर ठिय्या दिला. यात मान्यवरांनी संतप्त भावना व्यक्त केल्यात. याप्रसंगी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी विधीमंडळाच्या व्यस्ततेतून मुख्यमंत्र्यांचे पीडित बालिकेच्या पालकांसह उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलणे करून दिले.
दरम्यान, या सर्व प्रकारावर भाष्य करतांना पाचोरा येथील ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन यांनी भाष्य करतांना मुख्यमंत्र्यांनी चमकोगिरी केल्याचा आरोप केला. त्यांचा याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर येताच मोठी खळबळ उडाली. यानंतर आमदार किशोरआप्पा पाटील यांनी संदीप महाजन यांना कॉल करून त्यांना धमकावले. याच धमकीची क्लिप आता सोशल मीडयात व्हायरल झाली आहे. यात आमदार किशोर पाटील हे अतिशय खालच्या पातळीवर जात संदीप महाजन यांना शिवीगाळ करून धमकावत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे. ( लाईव्ह ट्रेंडस न्यूज या क्लीपच्या सत्यतेची पुष्टी करत नाही ) .
आमदार किशोरआप्पा पाटील यांनी संदीप महाजन यांना धमकावल्यानंतर त्यांनी समाजमाध्यमांमध्ये ही क्लीप व्हायरल केली आहे. तर फक्त जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात ही क्लीप व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी संदीप महाजन यांनी भूमिका स्पष्ट करत या प्रकरणी रल करत आपल्याला आमदार किशोर पाटील यांच्यापासून धोका असल्याचे सांगितले आहे. तर आमदार किशोरआप्पा पाटील यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूज लवकरच आपल्याला अपडेट करणार आहे.