Home धर्म-समाज पाचोर्‍यात कडकडीत बंद : बोहरी समाजबांधवांचा मोर्चा (व्हिडीओ)

पाचोर्‍यात कडकडीत बंद : बोहरी समाजबांधवांचा मोर्चा (व्हिडीओ)

0
41


पाचोरा प्रतिनिधी । पुलवामा येथील शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आज पाचोर्‍यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. याशिवाय, बोहरी समाज आणि इतरांनी मोर्चा काढून पाकिस्तानचा निषेध केला.

पुलवामा मध्ये अवंतीपुरा येथे सीआरपीएफ च्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड व भेकड हल्ला केला.यामध्ये भारतीय सैन्यातील ४० जवान शहीद झाले व अनेक जवान गंभीर रित्या जखमी झाले. या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पाचोरा शहरातील आठवडे बाजार स्टेशन रोड, जामनेर रोड, भडगाव रोड, भाजी मंडई, कापड दुकान, सराफ बाजार, होटेल आदींसह सर्व बाजारपेठ बंद ठेवून सर्व राजकीय पक्षी सामाजिक संघटना व शहरातील नागरिकांच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला जात आहे. बोहरी समाजातर्फे तिरंगा झेंडा घेऊन मूक मोर्चा काढून प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांना निवेदन देण्यात आले. या पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी चोफ बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच शहरातून तरूणांनीही स्वयंस्फुर्तीने मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला.

पहा– पाकिस्तानच्या निषेधाचा हा व्हिडीओ.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=2O66I3TMAwE[/embedyt]


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound