प.वि. पाटील विद्यालयात अभ्यास जत्रा; विद्यार्थ्यांचा उत्साह

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिरात अभ्यास जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेचे उद्घाटन एम. जे. कॉलेज मराठी विभागाच्या प्रा. संध्या महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

जत्रेचे स्वरूप:
इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित माहिती, चित्रे, प्रकल्प, मॉडेल, तक्ते, चित्रफीत आणि कार्ड यांच्या मदतीने आपले ज्ञान प्रदर्शित केले. विद्यार्थ्यांनी जत्रेतील स्टॉलप्रमाणे विविध वस्तूंची मांडणी करून शिक्षक, वर्गमित्र आणि पालकांना माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.

आयोजन: मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षिका स्वाती पाटील, कायनात सय्यद आणि मीनाक्षी इसे यांनी जत्रेचे आयोजन केले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content