नवी दिल्ली वृत्तसंस्था । माजी न्यायमूर्ती पी.सी. घोष यांची आज देशाच्या पहिल्या लोकयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यायाधीश शंभू चंद्र घोष यांचे चिरंजीव पिनाकी चंद्र घोष यांचा जन्म १९५२ मध्ये झाला. १९९७ मध्ये घोष कोलकत्ता हायकोर्टाचे न्यायाधीश बनले, डिसेंबर २०१२ मध्ये आंध्र प्रदेशच्या हायकोर्टात मुख्य न्यायाधीश म्हणून घोष यांची नियुक्ती झाली. पी.सी. घोष हे सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) सदस्य आहेत. २०१७ मध्ये ते सुप्रीम कोर्टातून निवृत्त झाले होते. लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून गेल्या पाच वर्षांपासून तकलादू कारणे देऊन टाळाटाळ केली जात आहे. याबाबत अण्णा हजारेंनी अनेक वेळा मोदी सरकारवर टीका केली होती. आज अखेर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी न्यायमूर्ती पी.सी. घोष यांची आज देशाच्या पहिल्या लोकयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली आहे.