रावेर प्रतिनिधी । रावेर ग्रामीण रूग्णालयात कोरोना रूग्ण आणि श्वास घेण्यास त्रास होणारे ३२ रूग्णांना ऑक्सिजन सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. ऑक्सीजनमुळे कोरोनाचा प्रभाव कमी झाला असे कोणही समजू नका, प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. एन.डी.महाजन यांनी केलेय.
लोकवर्गणीतून प्रशासनाने रावेर ग्रामीण रुग्णालयात तयार केलेल ऑक्सिजन सेंटरचा लाभ आता तालुक्यातील कोरोना बाधितांना होण्यास सुरुवात झाला आहे. श्वास घेण्यास त्रास होणारे २२ कोरोना पॉझिटीव्ह तर १० कोरोना संशयित रुग्ण रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन वर आहे. यामध्ये सर्वात कमी वय २८ वर्ष असलेला युवक तालुक्यातील अटवाड़ा येथील असून सर्वात जास्त वय ८२ वर्ष असलेला यावल तालुक्यातील आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात ३० जणाना ऑक्सिजन बेडची कॅपेसिटी आहे.वैद्यकीय अधिकारी डॉ महाजन यांनी लाईव्ह ट्रेंडस’शी बोलतांना सांगितले की तालुक्यात कोरोना व्हायरस प्रभाव कमी-झालेला नसून सोशल मीडिया मध्ये कोरोना नाही असे पोष्ट व्हायरल होतेय परंतु हे सफसेल खोट आहे. तालुक्यात पेशंट वाढताय जोपर्यंत कोरोनावर औषध उपलब्ध होत नाही तोपर्यंत सर्वांनी काळजी घेण्याचे आवहान त्यांनी केले आहे.