रावेर, प्रतिनिधी। हाय-रिक्स कोरोना बाधितांवर उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात ५६ बेडचे ऑक्सिजन सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. आज पासुन हाय-रिक्स बाधितांवर येथे उपचार होणार आहे.या ऑक्सिजन पाईपलाईनचे उदघाटन आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
रावेरला ऑक्सिजन सेंटर नसल्याने हाय-रिक्स कोरोना बाधित रुग्णाना उपचारासाठी जळगाव किंवा भुसावळ येथे हलवावे लागत होते.ऑक्सिजन उशिरा मिळाले म्हणून काही कोरोना बाधितांचा मृत्यू देखिल झाला आहे.याची दखल प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी लोकवर्गणीतून घेऊन तब्बल ५६ बेडचे सु-सज्ज ऑक्सिजन सेंटरसाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात कार्यान्वित केले आहे. यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासणा-यांना जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. त्यांना तात्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध होईल ऑक्सिजन अभावी कोणाचाची मृत्यू होणार नाही याचे जनतेतुन समाधान व्यक्त होत आहे.
यावल न्हावीत सुध्दा लवकरच ऑक्सिजन सेंटर
रावेर नंतर यावल व न्हावीत ऑक्सिजन सेंटर उभारण्यात येणार आहे. दोन्ही तालुक्यात एकूण १२८ कोरोना बाधितांवर उपचार सुरु असून तब्बल ६७२ जण कोरोनापासुन बरे झाले आहे. तसेच ऑक्सिजन अभावी आता जळगाव जाण्याची गरज नाही. त्यांच्यावर रावेर मध्येच ऑक्सिजन सेंटर उपचार केले जातील. यासाठी दोन शिप्टमध्ये डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल नागरीकांनी देखिल कोरोनाचे लक्षणे जाणवल्यास स्वतःहून पुढे येण्याचे अवाहन प्रांतधिकारी अजित थोरबोले यांनी केले आहे.
यांचा होती उपस्थिती
पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, डॉ. एन. डी. महाजन, नायब तहसिलदार संजय तायडे, पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, कॉग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, नगरसेवक आसिफ मेंबर, सुनिल कोंडे, सरपंच श्रीकांत महाजन, राहुल पाटील, गणेश महाजन, भास्कर महाजन, अतुलशेठ अग्रवाल, महमूद शेख,यांच्यासह ऑक्सिजन सेंटर उभारण्यासाठी मदत करणारे वेग-वेगळ्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासनासोबत दानशुरांचाही मोठा सहभाग: तहसिलदार देवगुणे
अनअपेक्षित कोरोना महामारी आपल्याकडे येतात प्रशासन कोरोना रोखण्यासाठी प्रर्यत्न केले. याला दानशुरांचाही मोठा सहभाग आहे. लॉकडाऊनच्या काळात ७ हजार किराणा किट्स आम्ही तालुक्यात वाटले. कोरोना पेशंटसाठी कोविड केअर सेंटर उभारले. बेड पलंगासह इतर सोई-सुविधा उपलब्ध केल्या. तालुक्यातून शासनाला मदत व्हावी म्हणुन पीएम व सिम फंडला ६ लाख तर माक्स न बांधलेल्यांकडून ४ लाख १४ हजार दंड स्वरुपात वसूल केलेला निधी सीएम फंडला दिला असे तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले. त्यांनी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सेंटर उभारण्यासाठी व्यापारी, सरपंच, स्वस्त धान्यदुकाने,लोकप्रतिनिधी आदींचा दानशुराचा आभार मानले.
शिल्लक निधितुन इतर सुविधा देणार
ऑक्सिजन सेंटर उभारण्यासाठी शिल्लक असलेला निधीतुन रावेर ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर येथे गरम पाणीचे हिटर लावले जातील. पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले.