संतापजनक : सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी २७ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमाला अटक करण्यात आली आहे.

वरणगाव पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन महिन्यांपासून दोन वेळा संशयित आरोपी अनिल बारकू निकम वय ४४ रा. भुसावळ याने दोन वेळा तोंड दाबून अत्याचार केला आहे. तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवेठार मारण्याची धमकीही दिली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पिडीत मुलीने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेवून या संदर्भात तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी २७ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी अनिल निकम याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव हे करीत आहे.

Protected Content