Home क्राईम विकृताचे संतापजनक कृत्य : अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

विकृताचे संतापजनक कृत्य : अल्पवयीन मुलीचा विनयभंग !


पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील पीडित मुलगी आपल्या घराच्या मागील बाजूस असलेल्या मोरीमध्ये २८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास अंघोळ करून कपडे बदलत होती. यावेळी घराच्या शेजारी राहणारा आरोपी मुकेश भारत चव्हाण याने घराच्या भिंतीवरून डोकावून पाहिले. पीडित मुलगी एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्याकडे टक लावून बघत तिची लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने तात्काळ पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे गाठून आपली आपबिती सांगितली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी आरोपी मुकेश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत.


Protected Content

Play sound