जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ओडीशा राज्यातील राष्ट्रीय अधिवेशन सत्तेचा वापर करून रद्द केल्याच्या निषेधार्थ, भारत मुक्ती मोर्चा आणि त्यांच्या सहयोगी संघटनांच्या वतीने सोमवारी १९ जानेवारी रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात घोषणाबाजी निषेध आंदोलन करण्यात आले.
षडयंत्राचा आरोप :
भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम यांनी माहिती दिली की, बामसेफ, बहुजन क्रांती मोर्चा आणि इतर घटक संघटनांच्या वतीने २६ ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान ओडीशातील बिलीयात्रा येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी दोन महिने आधीच कायदेशीर परवानगी घेण्यात आली होती. मात्र, अधिवेशनाची सर्व तयारी पूर्ण झालेली असताना, भाजप आणि आरएसएसने आपल्या राजकीय सत्तेचा गैरवापर करून हे अधिवेशन रद्द करण्यास प्रशासनाला भाग पाडले. हे लोकशाहीच्या विरोधात असलेले एक मोठे षडयंत्र असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

नागपूर आंदोलनाचा इशारा :
या निषेध आंदोलनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आमच्या न्याय्य मागण्यांची दखल न घेतल्यास आणि लोकशाही मार्गाने होणारे कार्यक्रम रोखण्याचे प्रयत्न न थांबल्यास, आगामी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर येथील आरएसएस मुख्यालयावर भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यांची होती मोठी उपस्थिती :
या आंदोलनात भारत मुक्ती मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा देवानंद निकम, सुनील देहाडे, भारत मुक्ती मोर्चा जळगाव जिल्हा आंदोलन प्रभारी, राष्ट्रीय किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष प्रमोद सौंदळे पाटील यांनी केले यावेळी बहुजन क्रांती मोर्चा राज्य पदाधिकारी सुमित्र अहिरे, शशिकांत हिंगोणेकर, एस एस राणे दिलीप जाधव विजय निकम, विनोद अडकमोल शकील शेख यांच्यासह राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, आणि मुलनिवासी बहुजन मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



