जामनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्रराज्य परिवहन मंडळाच्या मुदत संपलेल्या बसेसने प्रवास करतांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. खाजगी बसेसपेक्षा जास्त भाडे असुनही प्रवाशांना तुटलेल्या सिटवर बसून दणके खात प्रवास करावा लागतोय.
बसेसची रिपेअरींग सुध्दा केली जात नाही. बऱ्याच बसेसचे शाँकअप खराब झाले आहेत. पावसाळ्यात बसेसमध्ये पाणी गळती होत असल्याचे दिसून येते. अशा एक ना अनेक समस्या प्रवास करताना प्रवाशांना भेडसावत असतात. याकडे मात्र सोयीस्कर पणे दूर्लक्ष केले जात असल्याने समस्या जैसे थे आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.