पुणे वृत्तसंस्था । सध्या देशभरात नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात संतापाचे वातावरण आहे. याच, दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविषयावर भाष्य केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. “आपला भारत देश म्हणजे धर्मशाळा नाही”, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
देश म्हणून आपण आणखी ओझे वाहू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज ठाकरे बोलताना म्हणाले की, आपल्या देशाला बाहेरून आलेल्या लोकांची काय आवश्यकता आहे. आधीच लोकसंख्येमुळे अनेक सिस्टम्स फेल गेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही धर्मचा माणूस असेल त्याला बाहेरून आपल्या देशात आणायची गरजच नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, आपल्या देशामध्ये जे मुस्लिम नागरिक राहतात त्यांना असुरक्षित वाटण्याचं कारण काय? सर्व लोकांना सामावून घेण्यासाठी भारत देश ही धर्मशाळा नाही. अन्य देशातून आलेल्या लोकांना हकलावून द्यायला हवं. माणुसकीचा ठेका हा काही भारतानंच घेतलेला नाही. येथे राहत असलेल्यांची चिंता मिटत नाही, तर बाहेरून आणखी लोकं का हवी, असा संतप्त सवालही त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.