जळगावात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वि.पाटील विद्यालयात आज (दि.३० ऑगस्ट) रोजी सकाळी ११ वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शाळेत सर्वप्रथम मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्याहस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी गोपाल कृष्णाचे चित्र देऊन रंगभरण स्पर्धा घेण्यात आली तर इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची गोपाल कृष्णाच्या लीला त्यावर आधारित कथाकथनाची स्पर्धा आयोजित करण्यात आले. उपशिक्षिका सरला पाटील यांनी गोपाल कृष्ण जन्माष्टमी तसेच गोपाळकाला याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. 

दरवर्षी साजरी करण्यात येणाऱ्या दहीहंडीचे व्हिडिओज विद्यार्थ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन योगेश भालेराव यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाबद्दल शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भरभरून कौतुक केले.

 

Protected Content