जळगाव प्रतिनिधी | राजश्री शाहू खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बांभोरी जळगाव येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त क्रिकेट लीग वकृत्व स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या बक्षीस वितरण कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय जळगावचे प्राचार्य विश्वनाथ महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘राष्ट्रीय युवा दिना’निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा व निबंध लेखन आणि क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या.
क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन व क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा.आर व्ही पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या विविध स्पर्धांच्या माध्यमातून विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमास शाहू आयटीआयचे प्राचार्य कुंदन पाटीलतसेच प्रा.परमेश्वर महाजन, प्रा निखिल वाघ, प्रा शुभम पाटील. प्रा शांताराम वाघ, प्रा शुभम भोई, प्रथमेश बोरसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम पाटील तर आभार प्रदर्शन परमेश्वर महाजन यांनी केले.