ग्रामीण, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 

e lokshahi

 

जळगाव प्रतिनिधी । समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या उद्देशाने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि ग्रामिण भागातील महिलांसाठी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय तर दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार असून माहे डिसेंबर 2019 चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार, दि.16 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. तरी संबंधित समस्याग्रस्त व पीडीत महिलांना त्यांच्यासाठी आयोजित लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव विजयसिंग परदेशी यांनी यांनी केले आहे.

तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 26 सप्टेंबर, 2012 रोजीच्या परिपत्रकानुसार महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्याबाबत सूचना जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.  त्यानुसार माहे डिसेंबर 2019 चा जळगाव तालुक्याचा तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन तहसिल कार्यालय, जळगाव येथे सोमवार, दि.16 डिसेंबर, रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आले आहे. यासाठी जळगाव तालुक्यातील नागरिकांनी व तालुक्यातील संबंधित यंत्रणेनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन तहसिलदार वैशाली हिंगे यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील महिलांसाठीचे आयोजन

ग्रामीण भागातील महिलांच्या तक्रारी व ग्राहाणी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे डिसेंबर 2019 च्या महिला लोकशाही दिनाचे येत्या दि. 23 डिसेंबर, रोजी तहसिल कार्यालय, जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी ग्रामीण भागातील महिलांनी या लोकशाही दिनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सदस्य सचिव महिला लोकशाही दिन तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जळगाव (ग्रामीण भाग) यांनी केले आहे.

Protected Content