यावल / फैजपुर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील फैजपुर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग, धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर विद्यार्थी विकास विभाग व रॅगिंग समितीच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रॅगिंग समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पी आर.चौधरी हे होते. उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक फैजपुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी रॅगिंग विषयी मार्गदर्शनपर माहिती देताना सांगितले की एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या मनाविरुद्ध करायला लावलेली कृती म्हणजेच रॅगिंग रॅगगीमुळे नवीन विद्यार्थ्यांचे मानसिक शारीरिक खच्चीकरण होते रॅगीगमुळे कुटुंबांचे खच्चीकरण होते. अनेक विद्यार्थी जीवनातून उध्वस्त होतात आणि बऱ्याच जणांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. म्हणून शासनाला रॅगिंग चे हे कडक निर्बंध लागू करण्याची गरज भासली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी ही रॅगिंगला आनंद प्राप्त करण्याचा विकृत मार्ग असे संबोधित करून आपल्या मनोगतात विद्यार्थच्या मनातील रॅगिंग विषयी भीती आणि गैरसमज दूर करत असल्या विकृतींना बळी पडू नका आणि विकृतीतून आनंद घेण्याचा प्रयत्न ही करू नका, या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन शिकत राहिलात तर शासनालाही असल्या नियम व कायदे निर्माण करण्याची गरज भासणार नाही असे आव्हान केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ऍडव्होकेट स्मिता पाटील भुसावळ यांनी मार्गदर्शन केले त्यांनी रॅगिंग विषयी कायदेधीर बाबींचा उहापोह केला १५ मार्च १९९९ महाराष्ट्र शासनाने रॅगिंग प्रतिबंधक कायदा लागू केला हे व त्यानुसार याच्या मागचे एकमेव कारण म्हणजे शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी होणार शारीरिक मानसिक छळ होय. त्याची काही उदाहरणे देत रॅगिंग कसा केला जाते हे ही सांगितले. त्यासाठी बचावात्मक कायदेशीर आधार व आवश्यक वेगवेगळ्या कलमांची माहिती दिली. त्याच बरोबर यूजीसीने अँटी रॅगिंग साठी मदत म्हणून दिलेला टोल फ्री क्रमांक व बेवसाईटची पण माहिती दिली
तिसरा सत्रात प्रा.चंद्रकांत सपकाळे यांनी रॅगिंग म्हणजे काय हे सांगून सुरुवातीला मजा म्हणून याचा उपयोग करणारे नकळतपणे याची अति करतात आणि मग नंतर कित्येकांना शारीरिक,मानसिक छळाला बळी पडावे लागते म्हणून आपण विद्यार्थी दशेत शिक्षण बरोबरच चांगलं माणूस बनण्यासाठी ही प्रयत्न केले पाहिजे आणि असल्या प्रवृत्तीना वेळीच विरोध केला पाहिजे असे सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. कल्पना पाटील व सुत्रसंचलन प्रा.डॉ. राजश्री नेमाडे यांनी तर आभार प्रा. डॉ. सीमा बारी यांनी मानले.
कर्यक्रमच्या यशस्वी आयोजनात प्रा.वंदना बोरोले, प्रा.डॉ.सविता वाघमारे, प्रा.नाहीद कुरेशी, प्रा.डॉ.पल्लवी चौधरी, प्रा.वसुंदरा फेगड़े, प्रा.शुभांगी पाटिल, प्रा.डॉ. आरती भिड़े, प्रा.वैशाली कोष्टी, प्रा.उन्नति चौधरी, प्रा. पूर्वी ससाणे, उज्वला ठोसरे, प्रा. गुनवंती धांडे, प्रा. पूजा मेढे, प्रा.प्राजक्ता काचकुटे, प्रा.पल्लवी पाटील, प्रा स्वप्नील शहा, धीरज खैरे, शेखर महाजन, प्रकाश भिरुड मयूर महाजन यांनी मोलाचे सहकार्य केले.