जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद या गावामध्ये स्वामी समर्थ केंद्रावर सकाळी भूपाळी आरती व स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय गुरुकुल पीठ स्वामी समर्थ केंद्र नासिक यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी सप्ताहाला सुरुवात झाली असून आज दिवस दुसरा भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अखंड नाम जप यज्ञ प्रारंभ झाला असून आज गणेश याग गुरुचरित्र पारायणास महिला भगिनी आणि पुरुष एकूण 30 जण सेवेत सहभागी झाले.
स्वामी समर्थ केंद्र मसावद या ठिकाणचे व महिला भगिनी सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत माळ जप स्वामी चरित्र वाचन करित असतात. तर रात्री पुरुष सेवेकरी सेवा करीत असतात. असा हा नामजप यज्ञ सप्ताह सात दिवस अहोरात्र चालू असतो.