यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सैन्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दिनांक 25 एप्रिल 2022 रोजी या कार्यशाळेचे उद्घाटन दिलीप रामू पाटील (व्यवस्थापन परिषद सदस्य, कबचौउमवि, जळगाव) यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रोफेसर के.एफ.पवार (प्र. कुलसचिव, कबचौउमवि, जळगाव), जळगाव येथील नुतन मराठा महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख (व्यवस्थापन परिषद सदस्य, कबचौउमवि, जळगाव) समारोप प्रसंगी डॉ. सुनील बी. कुलकर्णी (संचालक, विद्यार्थी विकास विभाग कबचौउमवि, जळगाव), भुसावळ येथील पी. ओ. नहाटा महाविद्यालयाचे प्रा.ई. जी. नेहते (अधिसभा सदस्य, कबचौउमवि, जळगाव), ऐनपुर महाविद्यालयाचे डॉ.के.जी.कोल्हे (अधिसभा सदस्य, कबचौउमवि, जळगाव) आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून महेन्द्र पुंडलिक पाटील (ए. एस.आय.) संदीप निंबाजी पाटील (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक), पंकज नाले (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक), फैजपूर येथील डी. एन. महाविद्यालयाचे डॉ. आर. आर. राजपूत (एन.सी.सी. लेफ्टनंट), रघुनाथ धुडकू फिरके (माजी सैनिक), नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथील प्रा.शिवराज पाटील (एन.सी.सी. लेफ्टनंट) लाभणार आहेत.
या कार्यशाळेसाठी नूतन मराठा महाविद्यालय, (जळगाव), डी. एन. महाविद्यालय (फैजपूर) कला व विज्ञान महाविद्यालय (भालोद), नहाटा महाविद्यालय (भुसावळ), कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (वरणगाव) तसेच आयोजक महाविद्यालय येथील जवळपास 70 ते 80 विद्यार्थी सैन्य प्रशिक्षण कार्यशाळेसाठी उपस्थित राहणार असून कार्यशाळेत सकाळी 7.00 ते 10.00 – मैदानी प्रशिक्षण तसेच सकाळी 11.00 ते दुपारी 3.30 पर्यंत मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. सदर कार्यशाळेसाठी उपप्राचार्य उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील, प्रा. उपप्राचार्य एम. डी. खैरनार, प्रा.संजय पाटील, प्रा.एस.आर.गायकवाड (आय. क्यू. ए. सी. समन्वयक), डॉ.एस.पी.कापडे (विद्यार्थी विकास अधिकारी) डॉ.एच.जी.भंगाळे (संयोजक), डॉ.आर.डी.पवार (रासेयो,कार्यक्रम अधिकारी) व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आदी यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.