चाळीसगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र माळी समाज महासंघाची जळगाव जिल्हा कार्यकारणी बैठक रविवार ७ जुलै रोजी पाचोरा येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील विखुरलेला माळी समाज एकत्र आणून महासंघाचे कॅडर तयार करण्यात येणार आहे.
माळी महासंघाची पाचोरा येथे दुपारी २ वाजता स्वर्गवासी.राजीव गांधी टाऊन हॉल येथे बैठक होणार आहे. महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन मुबंई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही महाबैठक संपन्न होणार आहे. जळगाव जिल्हयाचे अध्यक्ष रमेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेचं डॉ. उत्तमराव महाजन , चेअरमन मेडीकलं कॉलेज चाळीसगाव , मॉर्डनबँकेचे. चेअरमन अशोक बापु खलाने, जळगावच्या नगरसेविका सरिता महाजन, वासुदेव महाजन, बापु महाजन पारोळा , प्रविण महाजन अमळनेर,सागर महाजन ,आबा महाजन भडगाव ,पदमाकर महाजन रावेर , छगन दादा झाल्टे, कैलास महाजन नगरसेवक धरणगाव ,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी जळगाव जिल्ह्यातील महासंघाचे सर्व तालुका अध्यक्ष ,शहर अध्यक्ष,गाव अध्यक्ष , सर्व आघाड्या प्रमुख जिल्हा पदाधिकारी होतकरू समाज बांधव व तसेच ज्या समाज बांधवांना महाराष्ट्र माळी समाज महासंघात काम करणयाची इच्छा आहे असे सर्व तरुण युवा वर्ग या सर्वांनी आवर्जून ह्या जळगाव जिल्हा महाबैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.