पिंपळेश्वर महादेव मंदिरात भव्य शिव महापुराण कथा सोहळ्याचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंपळेश्वर महादेव मंदिर, तुकाराम वाडी येथे १३ जानेवारी रोजी भव्य शिव महापुराण कथासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा १९ जानेवारी पर्यंत दररोज दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत भक्तांसाठी खुला राहणार आहे.

कथेसाठी हभप कृष्णकृपा प्रेममूर्ती दिलीपजी महाराज वृंदावन धाम यांचे मधुर वचन लाभणार आहेत. त्यांच्या प्रवचनातून शिव महापुराणाचे विविध अध्याय आणि महत्त्व भक्तांना समजावून सांगितले जाणार आहे.या आयोजनाचे प्रमुख विकी शंकर चौधरी, युवा मोर्चा चिटणीस, भाजप जळगाव शहर यांनी परिसरातील सर्व नागरिकांना या कथासोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

पिंपळेश्वर महादेव मंदिरात होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक तरुण व सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. या निमित्ताने भक्तांना आध्यात्मिक आनंद अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भाविकांनी या कथासोहळ्याला उपस्थित राहून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Protected Content