भुसावळात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; ६०० हून अधिक रिक्त पदांसाठी संधी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, प्रतिष्ठा महिला मंडळ, भुसावळ आणि समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन संतोषी माता बहुउद्देशीय क्रीडा संकुल, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ येथे करण्यात आले आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी:
10वी, 12वी/सर्व शाखेतील पदवीधारक/आयटीआय (ITI) सर्व ट्रेड/बीई (BE)/बीसीए (BCA)/एमबीए (MBA) तसेच सर्व डिग्री धारक पात्रता धारकांसाठी 600 पेक्षा जास्त रिक्त पदे उपलब्ध आहेत.

या आस्थापनांमध्ये नोकरीची संधी:
जिल्ह्यातील जैन फॉर्म फ्रेश जळगाव, युवा शक्ती नाशिक, हिताची ॲस्टीमो ब्रेक.प्रा.लि.जळगाव, किरण मशिनटुल्स जळगाव, फ्युचर टेक्स जळगाव, टी.डब्लू.जे, जळगाव, जैन इरिगेशन प्रा.लि, मानराज मोटर्स जळगाव, गोविंदा एच.आर.नाशिक या आस्थापनांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे.

अर्ज कसा करावा?
पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर लॉग-इन करून रिक्त पदांसाठी अर्ज करावा. ज्या उमेदवारांनी नावनोंदणी केलेली नाही, त्यांनी सर्व शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे व बायोडाटासह मेळाव्यात मुलाखतीच्या दिवशी हजर राहावे.

संपर्क:
याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या. 6.15) कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी केले आहे.

Protected Content