जळगावात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारतीय जैन संघटना आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन १४ ते १६ जानेवारी २०२५ दरम्यान करण्यात आले आहे. हे शिबिर स्व. उत्तमचंदजी पारख आणि स्व. जौहरीमलजी श्रीश्रीमाळ यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले आहे.

शिबिराचे उद्घाटन मंगळवार १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे होणार आहे. उद्घाटन समारंभाचे मुख्य अतिथी आमदार राजू मामा भोळे हे राहणार आहे.

या प्रसंगी उद्योजक अशोक जैन, सुशील बाफना, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.आयोजित शिबिरात अमेरिकेतील प्रसिद्ध प्लास्टिक सर्जरी तज्ञ डॉ. लॅरी वाइनस्टीन (MS, USA) रुग्णांवर मोफत उपचार करणार आहेत.

यासाठी सहसंयोजक डॉ. गिरीश ठाकुर (अधिष्ठाता), डॉ. एम.पी. पोटे (सह-अधिष्ठाता), भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनयकुमार पारख, संघटनेचे सदस्य डॉ. अशोक श्रीश्रीमाळ, संघटनेचे अध्यक्षबअजय राखेचा, सचिव सीए अनिल लोढा हे परिश्रम घेत आहे.

नोंदणी आणि संपर्क माहिती:
प्लास्टिक सर्जरी शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रुग्णांना लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आयोजक समितीशी संपर्क साधावा.

Protected Content