जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पं. दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठातील प्रधान सभागृहात करण्यात येणार आहे.
या मेळाव्याद्वारे २१०० पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदांसाठी १०वी, १२वी, सर्व शाखेतील पदवीधारक, आ.टी.आय. सर्व ट्रेड, बी.ई., बी.सी.ए., एम.बी.ए. यांसारख्या शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी मेळाव्यात सहभागी होण्याची संधी आहे. मेळाव्यांत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना नामांकित कंपन्यांकडून नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या कंपन्यांमध्ये यशस्वी अकॅडमी, मेरिको लिमिटेड, बालाजी जॉब प्लेसमेंट, एल.आय.सी. ऑफ इंडिया, वेल्नेस कॉनटन्स प्रा.लि. यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
उमेदवारांनी आपले नाव नोंदणीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर लॉगिन करावे आणि उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा. नोंदणी न केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
अधिक माहिती आणि समस्यांसाठी कार्यालयीन वेळेत ०२५७ २९५९७९० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त श्री. संदिप गायकवाड यांनी आवाहन केले आहे.