जळगावात नाट्य-साहित्य अभिवाचन शिबिराचे आयोजन

bollywood dance summer camp

जळगाव (प्रतिनिधी) आजच्या स्पर्धेच्या युगात लहान मुलांमध्ये अभ्यासाविषयी गोडी निर्माण होण्यासोबतच आत्मविश्‍वास वाढणे गरजेचे आहे. यादृष्टीकोनातून येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा व गंधार कला मंडळातर्फे ‘नाट्य साहित्य अभिवाचन शिबिराचे’ दि.१५ ते २१ एप्रिल २०१९ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

 

इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थी-विद्यार्थिंनींकरिता असणार्‍या या शिबिरात कथा, कविता, अग्रलेख, नाटिका, ललित, निबंध, कादंबरी, नाट्यछटा अशा अनेक साहित्यकृतींचे कौशल्यपूर्ण वाचन कसे करावे ? याचे मार्गदर्शन करण्यासोबतच स्मरणशक्‍ती वाढवणे, पाठांतर कसे करावे, सभाधीटपणा कसा असावा, यासंबंधी विविध तज्ञ व्यक्‍तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिराच्या अखेरच्या दिवशी शिबिरात सहभागी झालेल्या गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांच्या अभिवाचनाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी कोणत्याही पुस्तकातील एखादा उतारा अथवा कविता पाठ करून येणे अपेक्षित आहे. सहभागी विद्यार्थ्यांना शिबिर कालावधीत रोज अल्पोपहार व शिबिर संपल्यानंतर सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी अरविंद देशपांडे यांच्याशी कांताई सभागृह (जुने नटराज थिएटर) येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० दरम्यान संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Add Comment

Protected Content