फैजपूर (वार्ताहर) येथील तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावच्या वतीने दहा दिवशीय वार्षिक प्रशिक्षण शिबीर दिनांक ४ जून ते १३ जून २०१९ दरम्यान होणार आहे. दिल्ली येथील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या थल सैनिक कॅम्पच्या पूर्व तयारीसाठी हा कॅम्प आयोजित होत आहे.
शिबिराचे समादेशक अधिकारी मा.कर्नल सत्यशील बाबर असून प्रशासकीय अधिकारी मेजर सुशील कुमार, ए एन ओ साहेब, सुभेदार मेजर अनिल कुमार, जेसीओ, एन सी ओ, अधिकारी जळगाव जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील जे.डी, जे डब्लू आणि एस.डी.एस.डब्लू कडेट्स यांना मिलिटरी सब्जेक्टवर प्रशिक्षण देणार आहेत. धनाजी नाना महाविद्यालयात आतापर्यंत चार यशस्वी शिबिरांचे आयोजन २००९, २०११, १०१२ आणि २०१६ या वर्षी झाले असून होऊ घातलेला कॅम्प पाचवा कॅम्प असून १८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगाव परीक्षेत्रातील एकमेव महाविद्यालय आहे.
या शिबिरात ओबीस्टिकल कोर्स सोबतच फायरिंग, बॅटल फिल्ड बॅटल क्राफ्ट, जगिंग डिस्टन्स, मॅप रिडींग आणि मिलिटरी सब्जेक्ट शिकवले जाणार आहेत. याखेरीज रक्तदान शिबिरांचे आयोजन, स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाव, धुम्रपान विरोधी अभियान, एड्स जनजागृती आदी सामाजिक विषयांवर व्याख्याने, रॅली आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार, बँकिंग क्षेत्रातील बचतीचा फायदा, व्यक्तिमत्व विकास, पोस्टल सेवेची कार्यपद्धती, फायर ब्रिगेडचे कार्य, ट्राफिक पोलिसांचे कार्य आदी विषयावर तज्ञ मार्गदर्शकांचे व्याखाने आयोजित केलेली आहेत.
शिबिरात ४०० कडेट्स सहभागी होत असून १३५ मुली आणि २६५ मुले असतील यासोबत सुमारे ५० अधिकारी आणि कर्मचारी असणार आहेत. शिबिरातील मुले जळगाव जिल्ह्यातील पाल, खिरोदा, फैजपूर, सावदा, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, सामनेर, भुसावळ, जळगाव, धरणगाव आदी ठिकाणाहून सहभागी होणार आहेत. शिबिराच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर मंडळाचे अध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरिषदादा चौधरी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस.के.चौधरी, उपाध्यक्ष दामोदर हरी पाटील, चेअरमन लिलाधर विश्वनाथ चौधरी, व्हा चेअरमन प्रा.के.आर चौधरी सचिव प्रा.एम.टी.फिरके, सदस्य मिलिंद वाघुळदे, प्रा.पी.एच.राणे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ.अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा.डॉ.उदय जगताप, उपप्राचार्य प्रा.दिलीप तायडे, एनसीसी अधिकारी प्रा.लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, युवराज गाढे, नितिन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, प्रकाश भिरुड, नारायण जोगी आदींचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे.