Home Cities जामनेर पहूर येथे “विषमुक्त शेती” कार्यक्रमाचे आयोजन

पहूर येथे “विषमुक्त शेती” कार्यक्रमाचे आयोजन

0
43

indian farmer

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पहूर पेठ येथील ग्रामपंचायत हॉलमध्ये (दि.१०) रोजी “विषमुक्त शेती” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या आयोजित कार्यक्रमात विषमुक्त शेती, विषमुक्त भारत आणि विषमुक्त आरोग्य या विषयांवर पंजाब येथील डॉ. जि.एस.गिल (सी.एम.डी.) हरबेज वर्ल्ड यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी भोकरे, (कृषी प्रकल्प संचालक जि.जळगाव), संजय पवार (कृषीविभाग जळगाव), माधुरी गुजराती पुणे, सुभाष कुंभार (नायब तहसीलदार जामनेर, ईश्वर गोयर (बी.डी.ओ.पंचायत समिती जामनेर, संजय देशमुख मार्केट कमीटी सभापती जामनेर), निता पाटील सरपंच पहूर पेठ, शाम सावळे उपसरपंच हे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी कृषीविभागातील अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन संतोष पाटील (चिंचोले) यांनी केले असून शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound