चोपडा येथे आरोग्य शिबीराचे आयोजन

चोपडा प्रतिनिधी । विश्व मानव रूहानी केंद्र एक संपूर्ण लाभकारी परोपकारी आणि अध्यात्मिक संस्था आहे. जी जात, धर्म, रंग आणि वर्ण यांच्या भेदभावाशिवाय कार्य करते. संस्थेचे मुख्यालय गाव-नंवानगर पोस्ट-नांदापूर ता. कालका जि. पंचकुला हरियाणा मध्ये स्थित आहे. संस्थेद्वारे सामाजिक सेवा कार्यक्रमांच्या मालिका अंतर्गत वैद्यकीय तपासणी शिबिरे आयोजित केले जातात.

 

असेच एक शिबीराचे आयोजन शहरातील नर्मदा नगरात मंगळवार 26 मार्च रोजी वैद्यकीय तपासणी शिबिर विश्व मानव रूहानी केंद्र अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे. शिबीरात योग्य आणि अनुभवी डॉक्‍टरांच्या पथकाद्वारे रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून मोफत वैद्यकीय सल्ला तपासणी व औषधे दिली जाणार आहेत. रुग्ण आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी मोफत जेवण व आरामाची व्यवस्था केल्या जाणार असल्याचे माहिती आयोजकांकडून करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांना वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content