सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर संचलित धनाजी नाना महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन “धनोउत्सव 2024-25” निमित्त विद्यार्थ्यांसाठी आज, दिनांक २२ जानेवारी रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रांगोळी, मेहंदी, नेल आर्ट, केशरचना, वकृत्व, काव्यवाचन आणि चित्रकला यासारख्या स्पर्धांचा समावेश होता.
या स्पर्धांमध्ये एकूण 110 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. स्पर्धांचे परीक्षण महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केले, तसेच त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य आणि उपप्राचार्य यांचे मार्गदर्शनही या उपक्रमास लाभले.
विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून, त्यांच्यातील आत्मविश्वास आणि सृजनशीलता वृद्धिंगत होत आहे.