पहूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने २८ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२५ दरम्यान संगीतमय श्रीमद् भागवत कथा तथा भव्य दिव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत . श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते हभप श्री ज्ञानेश्वर महाराज शेलुदकर यांच्या मधुरवाणीतून होणार असून या कीर्तन सप्ताहात मंडळी हभप श्री जनार्दन महाराज आरावेकर, हभप श्री संजय महाराज पाचपोर अकोला, हभप श्री मोहन महाराज शेलार नाशिक, हभप श्री पांडुरंग महाराज घुले गाथा मंदिर श्री क्षेत्र देहू, हभप श्री समाधान महाराज भोजेकर, हभप श्री उमेश महाराज दशरथे आळंदी देवाची, हभप श्री उल्हास महाराज सूर्यवंशी आळंदी देवाची या महाराजांचे कीर्तन होणार असून, काल्याचे किर्तन रात्री हभप श्री गोविंद महाराज वरसाडेकर तसेच आळंदीकर गायक वादक मंडळी हजर राहणार आहेत. सप्ताहाच्या २५व्या वर्षानिमित्त रोप्य महोत्सव साजरा होणार आहे. म्हणून तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व वारकरी मंडळींनी या भव्य दिव्य कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन निमंत्रक: भागवताचार्य ह भ प श्री मंगेश महाराज चौधरी युवा कीर्तनकार हभप श्री अविनाश महाराज चौधरी व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी नाचनखेडा ता जामनेर यांनी केले आहे.