रावेर येथे बौध्द समाजाच्या ९ व्या सामुहिक विवाह सोहळ्याचे १२ मे रोजी आयोजन

marreage

 

रावेर (प्रतिनिधी) येथील फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय संस्था व रावेर तालुक्यातील समस्त बौध्द समाज यांच्या संयुक्तिक विद्यमाने दि.१२ मे रोजी सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ३० जोडप्याची नोंदणी झालेली असून शेवटच्या दिवसाअखेर ५० जोडप्यांची नोंदणी होण्याचा अंदाज आहे.

 

 

रावेर शहरातील सरदार जी.जी. हायस्कुल व ज्युनियर कॉलेज रावेर येथे बौध्द समाजाचा ९ वा सामुहिक विवाह सोहळा तर फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय संस्थे मार्फत तिसरा सामुहिक विवाह सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदर विवाह सोहळयासाठी बौध्द उपासक व उपाससिका यांनी जास्ती जास्त संख्येने नोंदणी करुन सहकार्य करावे,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सामुहिक विवाह करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे वेळ,पैसा, श्रम वाचतात व समाजाचा एकोपा निर्माण होऊन सामाजिक विकासाला हातभार लागतो.

 

 

विवाह  नोंदणी करीता संपर्क सामुहिक विवाह सोहळा  समिती अध्यक्ष राजेंद्र अटकाळे रावेर मो.नं ९७६४४९३५४५,७७२१९३४३५८ व संस्थेच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा जास्तीत जास्ती संख्येने नोंदणी केलेल्या उपवर वधु वरांसाठी,विशेष समाजकल्याण विभागा मार्फत कन्यादान योजनेतुन २०,०००, (वीस हजार) रुपये अनुदान मिळणार आहे.याची नोद घ्यावी त्यासाठी वधु वराचे शाळासोडल्याचे किंवा जन्माचे दाखले,जातीचे दाखले , अधिवास दाखले,आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो व विवाह झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत विवाह नोंदणी दाखला आणणे बंधनकारक राहील. तरी बौध्द समाजातील पालकांनी आपल्या पाल्यांची नावे जास्तीत जास्त संख्येने नोंदणी फुले,शाहु,आंबेडकर सार्वजनिक वाचनालय तहसिल कार्यलया समोर रावेर येथे करुन सामुहिक विवाह सोहळा समितीस सहकार्य करावे असे आवाहन फुले, शाहू, आंबेडकर बहुद्देशीय संस्था रावेर समितीतर्फे करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content