यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री गंगेश्वर महादेव मंदिर गंगानगर येथे संगीतमय शिवलीलामृत व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे.
या कथेची प्रवक्ते हरिभक्त परायण मनोज महाराज , दुसखेडा तालुका यावल हे राहणार असून या सप्ताहाचे मार्गदर्शक व आधारस्तंभ,हभप श्री श्री १००८ महामंडलेश्वर नंदजी सरस्वती, हभप सूर्यभान नंदजी महाराज शेलगावकर यांचे लाभत आहे. या कालखंडात सकाळी ६ ते ७ काकडा आरती, ७ ते ८ विष्णू सहस्रनाम, १० ते १ व दुपारी ५ ते ५ कथा वाचन हरिपाठ ५ ते ७ श्रीहरी कीर्तन दररोज रात्री ७ ते ९ या वेळात आयोजित करण्यात आलेले आहे.
या सप्ताह मध्ये कीर्तनकार महाराज हभप विजय महाराज टाकरखेडे, हभप हरिभक्त परायण संचित महाराज यावल, हभप धनराज महाराज ओझरखेडा, हभप संजीव दास महाराज सावखेडा, हभप योगेश महाराज चिंचोली, हभप संजय महाराज चितोडा, हभप संजय महाराज जमादार कासोदा, हभप सूर्यभान महाराज, हभप सूर्यभान नंदजी महाराज शेलगाव व रविवार २२ आणि २३ जानेवारी रोजी हभप मनोज महाराज दुसखेडा तालुका यावल यांचे रात्री ७ ते ९ काल्याचे किर्तन होईल. २१ जानेवारी २३ रोजी संध्याकाळी ३ ते ६ खंडेराव तळी भरण्याचा कार्यक्रम व करपुर गौरा दर्शन, २२ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ तसेच दुपारी १२ ते ३ महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
या भक्तीमय कार्यक्रमासाठी यावल शहरातील गंगानगर ,तिरुपती नगर, ,फालक नगर, स्वामीनारायण नगर ,गणपती नगर पांडुरंग सराफ नगर ,गणेश नगर, स्वामी समर्थ , विरार नगर ,सुतार वाळा, शहरातील गंगानगर तिरुपती नगर , फालक नगर स्वामीनारायण नगर गणपती नगर पांडुरंग सराफ नगर गणेश नगर स्वामी समर्थ नगर विरार नगर सुतार वाडा महाजन गल्ली बारीवाडा संभाजी पेठ युद्धा ग्रुप सुंदर नगरी येथील सर्व हरिभक्त परायण मंडळी यांची अनमोल सहकार्य लाभणार असून भाविकांनी या ज्ञानयज्ञामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन गंगेश्वर महादेव मंदिर, गंगा नगर येथील भाविक भक्तांनी केले आहे.