जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात दिनांक ०१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान महसुल पंधरवडा २०२४ साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त आज, दिनांक ०६/०८/२०२४ रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एक व्यापक अग्निशमन आणि बॉम्ब सदृष्य वस्तु आढळल्यास आपत्कालीन प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत तात्काळ रिकामी करण्याबाबत मॉक ड्रिलचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.
या अंतर्गत मॉक ड्रिल दुपारी ४:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठीचा लाकडी जिन्याखाली बेवारस लेदर बॅग आढळुन आल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत बॉम्ब शोधक व नाशक पथक, पोलीस अधिक्षक कार्यालय, अग्निशमन विभाग महानगर पालिका जळगाव, जिल्हा शल्य चिकीत्सक, जळगाव, 108 रुग्णवाहीका आपदामित्र पथक यांना संपर्क करुन तात्काळ बचाव पथकासह जिल्हाधिकारी कार्यालय येथे हजर राहण्यासाठी कळविण्यात आले.
यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून तात्काळ इमारत रिकामी करुन जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षित जागेत एकत्रित करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी यांना, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजुस असलेल्या ब्रिटीशकालीन आपत्कालीन लोखंडी जिन्याचा वापर करुन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक, पोलीस अधिक्षक कार्यालय, येथील अधिकारी व त्यांचे पथक तात्काळ ४.१८ वाजता हजर झाले व त्यांनी सदरची बॉम्ब सदृश्य बेवारस वस्तु शोधुन आपल्या ताब्यात घेतली व सदरची वस्तु ही बॉम्ब नसल्याची खात्री करुन सदर वस्तु धोकेदायक नसल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना माहिती दिली. तसेच याप्रसंगी नियोजन भवन शेजारी कचरा पेटीला लागलेल्या आगीवर महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळविले.
हे मॉकड्रील यशस्वीरीत्या पुर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मॉकड्रील मध्ये झालेल्या नियोजनातील त्रुटींबाबत सुधारणा करण्याबाबत सर्व विभागांना निर्देश दिले. तसेच अशाप्रकारचे मॉकड्रील रेल्वेस्थानक, बसस्थानक, शॉपींग मॉल, विमानतळ याठिकाणी आयोजित करतांना आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मॉकड्रीलच्या आयोजनाबाबतचे सर्व नियम पाळून शिस्तबद्ध मॉकड्रीलचे आयोजन करण्याचे आदेश दिले.
हे मॉकड्रिल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, उपजिल्हाधिकारी महसुल विजयकुमार ढगे, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, नायब तहसिलदार महसुल श्रीमती रुपाली काळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्नरवीरसिंह रावळ, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलीस निरीक्षक अमोल कावडे, अग्निशमन विभाग म.न.पा. चे अधिकारी शशीकांत बारी तसेच १०८ रुग्णवाहीकेतील डॉ.आकीब शहा व आपदा मित्र सतीष कांबळे, योगेश गालफाडे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे तसेच होमगार्ड मनोहर भोई, तुषार नेवे, शिवा कळसकर यांनी परिश्रम घेतले.