यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल येथे बुधवार 20 डिसेंबर रोजी मराठा समाजाच्या वधु-वर परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुल किनगावचे चेअरमन व अंन्न आणि औषधे प्रशासन महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त विजयकुमार देवचंद पाटील यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन मराठा समाजाच्या तरूण व तरूणींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल व व्ही.मार्ट परिवार यांनी केले आहे.
या मेळाव्यासाठी वधू व वर यांनी आपले परीचय पत्र (बायोडाटा) व स्व लिखित अर्जासह उपस्थित राहावे. मेळाव्यात वधू व वर यांनी व्यासपीठावर येऊन आपला संपुर्ण परिचय करून द्यावा व आपसात मेळ करण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी गरज पडल्यास आयोजकही पुढाकार घेऊन संबध जुळवण्यासाठी मदत करतील हा मेळावा पुर्णपणे निशुल्क असुन 20 डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात हा मेळावा घेण्यात येणार आहे
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आपले परिचय पत्र (मोबाईल नंबरसह) व्यंकटेश बालाजी एंन्टरप्रायजेस संचालित व्ही.मार्ट किनगाव येथे स्विकारले जातील व मेळाव्यात सोबत आणले तरी चालेल या मेळाव्यासाठी सकल मराठा समाज यावल तालूक्याचेही सहकार्य लाभणार आहे. या मेळाव्या संबधीत अधीक माहीतीसाठी आपण
खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा डी.बी.पाटील सर यावल शहर ९४२२७७४२१५, अजय पाटील सर, सावखेडा सिम तालुका यावल.९८८१५२७९५१, सुनिल गावडे (पाटील) पत्रकार यावल शहर ९४२१५१५३९९, महेश पाटील उंटावद तालुका यावल ९८२३२३६७४३ या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन समाज बांधवांना करण्यात येत आहे .