पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुका महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन शनिवारी २३ मार्च रोजी दुपारी ४ वाता शहरातील किसान महाविद्यालयात करण्यात आले आहे.
या प्रसंगी माजी पालकमंत्री डॉ. सतिष पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने याची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.आर.बी. पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पिरन अनुष्ठान यांच्यासह पारोळा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.