जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निवृत्ती नगर मधील केरळी महिला ट्रस्टचे अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवास शुक्रवार १५ पासून प्रारंभ होत आहे. १५ रोजी सकाळी १०.३० वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येवून १६ नोव्हे सकाळी ७.३० पर्यंत दर्शन घेता येणार आहे
उत्तर महाराष्ट्रात जळगावातील केरळी महिला ट्रस्टच्या या मंदिराची प्राणप्रतिष्ठा शास्त्रोक्त पध्दतीने केली असून पोर्णिमेचा हा मुहुर्त देखिल केरळातील गुरूजींशी बोलून शास्त्रोक्त पध्दतीने काढला जातो हे या मंदिराचे वैशिष्ट आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव केरळी महिला ट्रस्ट जळगावात निवृत्ती नगरातील अयप्पा स्वामी मंदीरात साजरा करीत असतात. या वर्षी दि १५ नोव्हे रोजी सकाळी १० वा ३० मि. ते १६ नोव्हे सकाळी ७ वा ३० मि. पर्यंत पोर्णिमा आणि कृतिका नक्षत्र असून शुभ मुहुर्त १५ नोव्हे दु ४ वा १९ मि. ते १६ पहाटे २ वा ५९ मि. असा आहे. तर कृतिका नक्षत्राची वेळ पहाटे २ वा ५९ मि. सूरू होवून १६ नोव्हें रोजी सकाळी ७ वा ३० मि समाप्त होईल असे ट्रस्टमार्फत कळवण्यात आले आहे. शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते या कालावधीत पूजा संपन्न होणार आहे. तामीलनाडू येथे मुर्तीसाठी प्रसिध्द महाबलीपुरमहून तसेच केरळ कोटयायम तंथनम प्रतिकृती असलेल्या कार्तिकस्वामी, तामीळनाडू मथुराई मिनाक्षी केरळ येथील गुरूवायुर येथील भगवान श्री विष्णूची मुर्ती या ठीकाणी विराजमान आहे. जानेवारी २००० ला संपुर्ण दक्षिणात्य पध्दतीने प्राणप्रतिष्ठा तामिळनाडू येथील गुरूजींच्या हस्ते करण्यात आली.तिन प्रकारचे अभिषेक धन,सोने, चांदी यात भाविकांकडून चिल्लर पैसे गोळा करून अभिषेक व परत वाटप, सोने व चांदी अभिषेकसाठी चेन्नई वरून १०८ नाणे मागवून केला जातो. या काळात दर्शन अतिशय शुभ मानले जात असून केलेला नवस फेडण्यासाठी हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात. जागृत देवस्थान म्हणून कार्तिक स्वामी मंदिर प्रसिध्द आहे. आजपासून कार्तिक पोर्णिमा सूरू होत असल्याने मंदिर भक्तासाठी संपुर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदीर गेल्या २३ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमीत्त दर्शनासाठी खुले करण्यात येते. या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीर असून ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक दुरदेशातून मोठया प्रमाणात येत असतात. अभिषेक व पूजेसाठी गुरूजीसह स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली मंदिर दर्शनासाठी १६ नोव्हेंबर पर्यंत खुले करण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविकांनी दर्शन घ्यावे असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी केरळी महिला ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष वासंती अयर यांचेशी ९४०५१४३२३५ या क्रमांकवर संपर्क साधावा.