जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भारतीय जैन संघटना व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १४, १५ आणि १६ जानेवारी २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्व. उतमचंदजी पारख व स्व. जौहरीमलजी श्रीश्रीमाळ यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला अमेरिकेतील सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. लॅरी वाईनस्टीन व त्यांची टीम हे दुभंगलेले ओठ, पापण्यांची विकृती, चेहऱ्यावरील व्रण व डाग, नाक व कान यावरील बाह्य विकृतींवर चिकटलेली बोटे, फुगलेले गाल आदी प्रकारच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत . जळालेल्या, भाजलेल्या व पांढरे डाग असलेल्या रुग्णांवर शास्त्रक्रिया करण्यात येणार नाही. शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व रुग्णांना औषधी सोबत रूग्णांना चहा व जेवणाची देखील मोफत व्यवस्था केली जाणार आहे.
दरम्यान, हे शिबिर मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी – ९ ते १२ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे रूग्णांनी तपासणीसाठी उपाशी पोटी यावे. आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.