जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जळगाव आणि वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, मु. जे. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११, १२ व १३ फेब्रुवारी 2025 दरम्यान वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी 11:00 वाजता, जुना कॉन्फरन्स हॉल येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. या उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा चे अधिष्ठाता डॉ. सी. ए.अब्दुल कादीर आरसीवाला, उद्योजकता शिबिर समन्वयक श्री. दिनेश पाटील, मु.जे. महाविद्यालयाचे प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कक्षाचे समन्वयक डॉ. मारुती देशेट्टीवार तसेच मानव्य विद्याशाखाचे अधिष्ठाता डॉ. भूपेंद्र केसूर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अब्दुल कादीर अरसीवाला यांनी शिबिराचे प्रास्ताविक करत पाहुण्यांचा परिचय करून दिला. ही तीन दिवसीय कार्यशाळा असून, यात विद्यार्थ्यांसाठी खालील महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे:
– उद्योजकता म्हणजे काय आणि तिचे महत्त्व
– संवाद कौशल्ये आणि प्रभावी संवाद तंत्र
– प्रकल्प अहवालाच्या आर्थिक बाबी
– प्रकल्प अहवाल सादरीकरणाची कला आणि विविध प्रकार
– आधुनिक युगातील उद्योजकांसाठी डिजिटल मार्केटिंग
– यशस्वी उद्योजकांची मानसिकता आणि दृष्टिकोन
– संघटन कौशल्य (टीम बिल्डिंग) व कार्यक्षम नेतृत्व
– यशस्वी उद्योजकांचे अनुभव कथन
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, त्यांना व्यवसाय उभारणी, व्यवस्थापन कौशल्ये आणि उद्योजकतेचे व्यावहारिक ज्ञान मिळवण्याची संधी उपलब्ध होईल.
– महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जळगाव
– वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, मु. जे. महाविद्यालय