जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अॅण्ड एम्पावरमेंट, नवीदिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ३० सप्टेंबर रोजी ‘ट्रान्सजेंडर आणि सामाजिक भूमिका’ या विषयावर विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळा सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी १० वाजता खा. स्मिताताई वाघ यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, धरणगावचे तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी उपस्थित राहणार आहे. या एक दिवसीय कार्यशाळेत दोन सत्र होणार असून पहिल्या सत्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरतदादा अमळकर, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील तर दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयसिंग वाघ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचा समारोप दुपारी २.३० वाजता परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
कार्यशाळेत सहभागी होणेसाठी नोंदणी अनिवार्य असून दि. ३० रोजी सकाळी ९.३० ते १०.०० या वेळेत विनामूल्य नोंदणी करता येईल. या कार्यशाळेत सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक तथा कार्यशाळेचे मुख्य निमंत्रक प्रा. सुधीर भटकर, सह निमंत्रक डॉ. गोपी सोरडे, अॅङ सूर्यकांत देशमुख यांनी केले आहे.