जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उच्च न्यायालयातील प्रलंबीत खटले निकाली काढण्यासाठी उच्च मुंबई आणि त्यांचे खंडपीठ नागपुर व औरंगाबाद येथे ३० नोव्हेंबर, २०२४ आणि १ डिसेंबर, २०२४ या कालावधीत विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीस वरीष्ठ स्तर एस.पी. सैय्यद यांनी दिली आहे.
जळगाव जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालयातील प्रलंबीत आहेत व ही प्रकरणे तडजोडीने मिटावीत अशी ज्यांची इच्छा आहे. अशा पक्षकारांची प्रकरणे या विशेष लोकअदालतीत ठेवता येणार आहे. त्यासाठी एम.क्यु.एस, एम शेख अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व बोलणी बैठक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व बोलणी बैठक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव येथे घेण्यात येणार आहे. संबधीत पक्षकार प्रत्यक्ष अथवा आभासी पध्दतीने यात सहभागी होउ शकतात. तरी अशा पक्षकारांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन एम.क्यु.एस, एम शेख अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.