यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |यावल तालुक्यातील किनगाव येथे शिवजयंतीच्या निमित्ताने येथील सामाजिक संस्थांच्या वतीने शिव व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ९ फेबुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बाजारपट्टा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्त शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स्वर्गीय केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष व इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव मनिष विजयकुमार पाटील,कल्पतरू सेवा फाउंडेशन,शिवजयंती उत्सव समिती व ग्रामस्थ किनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील हे आहेत.
भवानी पेठ,बाजार पट्टा चौक,नेहरू विदयालया जवळ किनगाव बुद्रुक तालुका यावल येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन स्वर्गीय केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनिष विजयकुमार पाटील व कल्पतरू सेवा फाउंडेशन तसेच शिव जयंती उत्सव समिती किनगाव व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.