महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सेवाविषयक संवाद कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय सेवेत काम-काज करत असतांना अधिकारी आणि कर्मचारी यांचे स्वतःच्या सेवा विषयक बाबींकडे दुर्लक्ष होत असते. याच कारणामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नती, सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यास विलंब होतो, त्याअनुषंगाने अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक अडचणी सोडविण्यासाठी येत्या २३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृह येथे मोहिम स्वरुपात संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात सेवानिवृत्ती लाभ, स्थायित्व प्रस्ताव, हिंदी/मराठी सुट, संगणक अर्हता सुट, विभागीय परीक्षा सुट, कालबध्द पदोन्नती, बिंदुनामावली अदयावत करणे, वेतन देयक, सेवापुस्तक अदयावत करणे, वैद्यकिय देयक, प्रवास भत्ता देयक, गृह अग्रीम / वाहन अप्रीम / संगणक अग्रीम, ३९ (ब) प्रस्ताव, शासकीय निवासस्थान दुरुस्ती, कार्यालयातील आवश्यक सुविधा विषयांबाबत येणाऱ्या अडी अडचणींबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या कर्मचारी यांनी आपल्या कार्यालय प्रमुख यांची परवानगी घेवून उपस्थित रहावे आणि या कार्यक्रमाकरीता उपस्थित राहण्यास इच्छुक अधिकारी किंवा कर्मचारी यांनी आपली नावे शनिवार 21 तारखेला कार्यालयीन ई-मेलवर ([email protected] सायंकाळी ५ वाजे पावेतो सादर कराण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content