जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने विश्वलेवा गणबोली दिनानिमित्त उद्या शुक्रवार दि. १ डिसेंबर रोजी व्याख्यान आणि लेवा गणबोली कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
रविवारी ३ डिेसेंबर हा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतीदिन आहे. हा स्मृतीदिन विश्वलेवा गणबोली दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. १ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात दुपारी २:३० वाजता सावदा येथील प्रा. व. पु. होले यांचे “लेवा गणबोलीचे माधुर्य” या विषयावर व्याख्यान होणार आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी राहतील. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांची देखील उपस्थिती असणार आहे. व्याख्यानानंतर लेवा गणबोली कवी संमेलन होणार असून यामध्ये डॉ. अतुल सरोदे, संध्याताई भोळे, संध्याताई महाजन, शितलताई पाटील, अरविंद नारखेडे हे कवी/कवयित्री सहभागी होणार आहेत.