पहूर ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर शहर पत्रकार संघटना व पहूर पोलीस स्टेशन त्यांच्या संयुक्त विद्यमाने व रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांच्या सौजन्याने पहूर पोलीस स्टेशन येथे आज सकाळी 11 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पहूर पोलीस स्टेशन येथे पत्रकार दिन व महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताहाचे औचित्य साधून पहूर शहर पत्रकार संघटना व पहूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या सौजन्याने आज 10 जानेवारी 2025 वार शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता पहूर पोलिस स्टेशन आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पहूर परिसरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून या महान कार्यास हातभार लावावा अशी विनंती पहूर शहर पत्रकार संघटना व पहूर पोलीस स्टेशन यांनी केली आहे.