नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवकांना कामावरून कमी करण्याचे आदेश

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक यांना रोजगार सेवक या पदावरून  कमी करा, असा आदेश प्रभारी गटविकास अधिकारी यांच्यातर्फे नांदगाव ग्रामसेवक व सरपंच यांना देण्यात आले आहे.

निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ मध्ये बाबुराव लक्ष्मण निकम व नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांनी एकाच शेतात दोन विहिरीचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान घेतले होते. परंतु एकाच विहिरीचे खोदकाम व बांधकाम केले तर दुसऱ्या विहिरीचे अंदाजित अनुदान १ लाख ३४ लाटून भ्रष्टाचार केला होता. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन रामा आसने यांनी तक्रार दाखल केली होती,वारंवार तक्रार व स्मरणपत्र, दोन वेळा उपोषण करण्यात आले होते, महासंघाच्या वतीने तक्रारदार आसने यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे यश प्राप्त झाले आहे, तसेच पंचायत समिती या स्थानिक प्रशासन ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांनी ग्राम रोजगार सेवक या पदावरून कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

वारंवार तक्रार व स्मरणपत्र देऊन सुद्धा संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे आम्ही माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद समोर उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, यापुढे सुद्धा कोणीही अश्याप्रकारे शासकीय निधीचा दुरुपयोग निधी हडप करण्याचा प्रयत्न केला तर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने तक्रारी दाखल करण्यात येतील असे महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन आसने यांनी सांगितले.

 

 

Protected Content