परमबीर सिंग यांच्या विरोधात चार्जशीट दाखल न करण्याचे आदेश

मुंबई प्रतिनिधी | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या यांच्या विरोधात सध्यातरी कुठलीही चार्जशीट दाखल न करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. याशिवाय, त्यांना अटक न करण्याच्या आदेशालाही न्यायालयाने कायम ठेवले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, परमबीर सिंग यांच्याविरुद्धचा तपास राज्य पोलिसांनी न करता अन्य एजन्सीद्वारे केला जावा असे प्रथमदर्शनी मत आहे. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना अटक न करण्याचा आदेश कायम ठेवला आहे. तसेच, परमबीर यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांकडून कोणतेही चलन दाखल केले जाणार नसले तरी तपास सुरूच राहणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

सीबीआयने न्यायालयात म्हटले की, महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंहवर नोंदवलेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग केल्यास आमची हरकत नाही. त्यावर न्यायालयाने सीबीआयला एका आठवड्यात लेखी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. इतर पक्षकारांना सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी ११ जानेवारीला होणार आहे.

 

Protected Content